पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केली विशेष रणनीती

नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एक खास रणनीती तयार केली आहे. त्याअंतर्गत सर्व जिल्हा आणि राज्यातील अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित क्षेत्रे ओळखून त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे लागू करणे ही कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने अवलंबलेली रणनीती  आहे. 

कोविड-१९ : राज्यात दुप्पटीने वाढणारा रुग्णांचा आकडा नियंत्रणात

या व्यतिरिक्त कोविड -१९ विषाणूंचा संसर्ग झालेल्यांचा शोध घेणे, त्यांच्या संपर्कांत आलेल्या लोकांना शोधून काढणे, त्यांना विलग ठेवणे, उपचारांचे व्यवस्थापन करणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे हा देखील या रणनीतीचा एक भाग आहे. गृहमंत्रालयाने निवेदनात असे सांगितले की, कोरोनाची लक्षणं असू वा नसो. सर्व संशयित रूग्णांची तपासणी केली जात आहे. या व्यतिरिक्त संसर्ग होण्याची शक्यता असलेले संशयित आणि ज्यांना गंभीर श्वसनाचा (एसएआरआय) त्रास आहे अशा लोकांचीही तपासणी केली जात आहे.

मुंबईत २ हजारहून अधिक रुग्ण, समूह संसर्गाचा धोका नसल्याने मोठा दिलासा

तसंच, हॉटस्पॉट रेड झोन असलेल्या जिल्हा किंवा शहरामध्ये मोठ्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे याठिकाणी जास्त लक्ष दिले जात आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व खासगी वाहन, सार्वजनिक वाहतूक आणि कोणत्याही व्यक्तीला या परिसरातून बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 

आनंदाची बातमी: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ