पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोविड१९ फॅक्टसाठी पोर्टलची निर्मिती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहाय्यक सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव

सध्याच्या परिस्थितीत योग्य माहिती पुरवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोविड १९ संदर्भातील सत्य आणि अचूक माहितीसाठी पोर्टलची निर्मिती करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहाय्यक सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे.  राज्य पातळीवर अशाच प्रकारचे स्वतंत्र पोर्टल संदर्भातील सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊन कसा संपवायचा, पंतप्रधानांनी मागविल्या शिफारशी

देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आणखी वाढला आहे. ३२८ नवे रुग्ण आढळले असून कोरोनाग्रस्तांचा आकडा १९६५ वर पोहचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी दिली. आतापर्यंत देशात ५०नागरिकांनी कोरोनामुळे जीव गमावल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहाय्यक सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवसांची तपस्या भंग करु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

कोरोनामुळे या सात शहरांतील घरांच्या किंमती होणार कमी

दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाकात सहभागी झालेल्या १, ८०४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून यातील ३३४जण रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दिल्लीतील हिंदूराव रुग्णालयातील डॉक्टरांनी मास्क आणि सुरक्षिततेसंदर्भातील साहित्य उपलब्ध नसल्याने राजीनामा दिल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर लव अग्रवाल म्हणाले की, जवळपास १.५ कोटी पीपीईची ऑर्डर मागवण्यात आली आहे. एवढेच नाहीत तर १ कोटी एन95 मास्कही मागवले असून डॉक्टरांना आवश्यक साधने मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Central Government Started Portal For Covid 19 Fact Check says Punya Salila Srivastava Home Ministry