पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण: जम्मू-काश्मीरमध्ये 28 हजार जवान पाठवले नाही

जम्मू-काश्मीर जवान

केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये 28 हजार जवान तैनात केले असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. जम्मू -काश्मीरमध्ये 28 हजार सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आज प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र हे वृत्त खोटं असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 10 हजार जवानांना पाठवण्याचे आदेश दिले असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. हे जवान जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये गस्त घालणार असून त्यांना निश्चित ठिकाणी पोहचवण्यात येत आहे. 

EVM विरोधात उठावाची विरोधकांची हाक, २१ ऑगस्टला पक्षविरहित मोर्चा

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि दहशतवादाविरोधात चालवल्या जाणाऱ्या मोहिमेला आणखी मजबूत करण्यासाठी 10 हजार जवानांना तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या आठवड्यामध्ये घेतला होता. या निर्णयाला आठवडा पूर्ण होत नाही तोच 28 हजार जवानांच्या अतिरिक्त तुकड्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार असल्याचे वृत्त आज सर्व प्रसारमाध्यमांनी दिले. यावर आज केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण देत हे वृत्त खोटं असल्याचे सांगितले. 

मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार, पण...

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये 10 हजार जवानांना घेऊन जाण्यासाठी वायुदलाचे के सी- 17 ग्लोबमास्टर विमानाची मदत घेतली जात आहे. गृहमंत्रालयाने शुक्रवारी वायुसेना आणि लष्कराला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी श्रीनगर येथे पोहचले आहेत. जम्मू-काश्मीरच्या अतिसंवेदनशील भाग आणि इतर ठिकाणी हे जवान गस्त घालणार आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांना जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना दहशतवादी लक्ष्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. 

खूशखबर! SBI या बँक खात्यावर देत आहे दुहेरी फायदा