पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी पेन्शन योजना, महिना ३००० मिळणार

नरेंद्रसिंह तोमर

देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवी पेन्शन योजना आणली आहे. या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना वयाची साठीनंतर प्रतिमहिना ३००० रुपये निवृत्तीवेतन (पेन्शन) म्हणून मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत शुक्रवारी ही माहिती दिली.

ते म्हणाले, देशातील सर्व लहान आणि मध्यम गटातील शेतकऱ्यांसाठी ही पेन्शन योजना लागू करण्याला सरकारने मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांकडे उतारवयात पैसा नसतो. त्यामुळे त्यांना रोजच्या गरजा भागविणेही अवघड होऊन बसते. याचा विचार करून सामाजिक हेतूने सरकारने ही योजना काही अटींसह लागू केली आहे.

मोदी योगासनाला मीडिया इव्हेंट बनवत आहेत, दिग्विजय सिंह यांचा टोला

या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रतिमहिना ३००० रुपये पेन्शन दिली जाईल. वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना ही पेन्शन मिळेल. या योजनेसाठी शेतकऱ्यांना वयाच्या १८ ते ४० या वयात नोंदणी करावी लागणार आहे. भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) कडून ही योजना चालविण्यात येईल. शेतकऱ्यांना एलआयसीकडेच या योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.

योजना नक्की कशी चालणार?
योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिमहिना १०० रुपये पेन्शन फंडात भरावे लागणार आहेत. वय वर्षे २९ असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा आकडा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या वयानुसार त्यात बदल होऊ शकतो. शेतकरी जेवढी रक्कम पेन्शन योजनेत गुंतवतील, तेवढीच रक्कम सरकारकडूनही गुंतविली जाईल. 
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षापर्यंत १०७७४.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.