पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोवल परतताच काश्मीरमध्ये पाठवले १० हजार जवान, मेहबुबा संतापल्या

डोवल परतताच काश्मीरमध्ये पाठवले १० हजार जवान, मेहबुबा भडकल्या

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवल काश्मीर दौऱ्यावरुन परतताच तिथे १०००० अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय घेतला गेला असून काही जवान रवानाही करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी आदेशात म्हटले आहे की, अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दलाच्या तैनातीमुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम आणखी मजबूत होईल. त्याचबरोबर राज्यात कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहण्यास मदत होईल. 

जम्मू-काश्मीरमधील टॉप १० दहशतवाद्यांची यादी केंद्राकडून जाहीर

तर दुसरीकडे राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्राच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे काश्मीर खोऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरची समस्या राजकीय आहे. सैन्यदलाच्या मदतीने ती सोडवता येणार नाही. भारत सरकारने यावर पुन्हा विचार करुन आपली निती बदलण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध भागात तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या जवानांना एअरलिफ्ट करुन थेट काश्मीरमध्ये पाठवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या १०० अतिरिक्त कंपन्या तैनात केले जात आहेत. प्रत्येक कंपनीत १०० जवान असतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने २५ जुलै रोजी केंद्रीय सशस्त्र दलांच्या अतिरिक्त १०० कंपन्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीचा समावेश आहे.

दरम्यान, अजित डोवल हे बुधवारी श्रीनगरला गेले होते. त्यांनी आपल्या दौऱ्यात सुरक्षा, गुप्तचर यंत्रणेच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या होत्या. यामध्ये त्यांनी राज्यपालांचे सल्लागार के विजयकुमार, मुख्य सचिव बीवीआर सुब्रमण्यम, पोलिस महासंचालक दिलबाग सिंह आदी अधिकाऱ्यांची भेट घेतली.