पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनगणना अधिकारी 'तुम्ही काय खाता' असाही प्रश्न विचारणार

लोकसंख्या अधिकारी घरी माहिती घेताना

जनगणनेची प्रक्रिया यावर्षी एप्रिलमध्ये सुरू होते आहे. एक एप्रिलपासून देशात घरोघरी जाऊन जनगणना अधिकारी माहिती गोळा करण्याचे काम करतील. पण यावेळी नागरिकांकडून वेगळी माहितीही घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्ही काय खाता, तुमच्या घरात किती चारचाकी, दुचाकी गाड्या आहेत, तुमच्या घरात किती मोबाईल फोन आणि टेलिफोन आहेत, याची माहितीही नागरिकांकडे विचारण्यात येणार आहे. यापैकी काही प्रश्न मजेशीर असले तरी त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

आईच्या मृत्यूनंतर मुलीवर सातत्याने बलात्कार, बापाला मिळाली कठोर शिक्षा

केंद्रीय जनगणना महासचिव आणि आयुक्त यांनी गुरुवारी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये जनगणना करताना अधिकारी प्रत्येक घरी नक्की किती प्रश्न विचारणार याची माहिती देण्यात आली आहे. या पत्रकानुसार जनगणना अधिकारी यावेळी एकूण ३१ प्रश्न विचारणार आहेत. या प्रश्नामध्ये तुमच्या घरात वीजपुरवठा कोणाकडून केला जातो, घरात शौचालय आहे का, शौचालय कोणत्या स्वरुपाचे आहे, घरात स्वयंपाकगृह आहे का, घरात सिलिंडर आहे की पाईप गॅस असे प्रमुख प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

इतर प्रश्नांमध्ये तुमच्या कुटुंबाकडे किती दुचाकी आहेत, सायकली आहेत, घरात रेडिओ ट्रन्झिस्टर आहे का, टीव्ही आहे का, लॅपटॉप, डेस्कटॉप आहेत का, घरात इंटरनेट आहे का असे प्रश्न विचारण्यात येणार आहे.

सत्तेचे टॉनिक संपल्यामुळे सूज उतरली, शिवसेनेची भाजपवर टीका

केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सूची NPR अद्ययावत करण्याचा निर्णयही घेतला आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.