पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनगणना २०२१ हायटेक, स्वतः ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा

जनगणना २०२१

पुढल्यावर्षी देशभरात केली जाणारी जनगणना यंदा हायटेक होणार आहे. नागरिक आपल्या घरी बसून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या कुटुंबाबद्दल, निवासाबद्दल माहिती भरू शकणार आहेत. जनगणना महासंचालनालयाद्वारे तयार करण्यात येणाऱ्या वेबसाईटवर ही माहिती भरता येईल. आता जनगणनेसाठी नागरिकांना आपला मोबाईल क्रमांकही द्यावा लागणार आहे.

... त्यांचे ह्रदय तपासावे लागेल, शरद पवार यांचा पक्ष सोडणाऱ्यांना टोला

जनगणनेची माहिती भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर सर्व माहिती न भरल्यास जनगणनेचे काम करणारे कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या घरी जाणार आहेत. त्याच्याकडून उर्वरित सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीनेच भरून घेतली जाईल. जर ऑनलाईन पद्धतीने माहिती भरणे शक्य नसेल, तर जनगणनेसाठी घरी आलेली व्यक्ती त्याच्याकडील फॉर्मवर सर्व माहिती भरून घेईल. शक्य असेल, तर मोबाईलच्या साह्यानेही ऑनलाईन पद्धतीने माहिती भरली जाईल.

अलिबागच्या किनाऱ्यावरील बेकायदा बंगले आठवड्यात पाडा - हायकोर्ट

एक एप्रिल २०२० पासून जनगणना सुरू होणार
२०११ प्रमाणे यंदाही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा पुढील वर्षी म्हणजे २०२० मध्ये एक एप्रिलला सुरू होईल आणि ३० सप्टेंबरला संपेल. दुसरा टप्पा २०२१ मध्ये ९ ते २८ फेब्रुवारीमध्ये असेल. २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये बेघरांची जनगणना करण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून जनगणनेचे काम केले जाईल.

६२ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार
पहिल्या टप्प्यात निवासासंदर्भातील ३४ प्रश्न विचारण्यात येतील. तर दुसऱ्या टप्प्यात कुटुंबासंदर्भातील २८ प्रश्न विचारले जातील. एकूण ६२ प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यावी लागणार आहेत.