पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशी असेल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची वर्दी

एडीजीपीआयने शेअर केले फोटो

भारतीय लष्कर प्रमुखाची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या जनरल बिपीन रावत यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या वर्षात ते नव्या भूमिकेत लष्करी सेवेत सहभागी होतील. आर्मी, नेव्ही एअरफोर्स या तिन्ही दलामधील समन्वयाच्या पार्श्वभूमीवर सीडीएसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सीडीएसच्या कार्यपद्धतीची चर्चा रंगत असताना आता सीडीएस अधिकाऱ्याच्या पोशाखासंदर्भातील माहिती समोर येत आहे. 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफबद्दल हे पाच मुद्दे तुम्हाला माहितीये?

सीडीएसचे कार्यालय हे दक्षिण ब्लॉकमध्ये असणार आहे. त्यांचा पोशाख हा पॅरंट सर्विससारखा असून तो ऑलिव्ह ग्रीनमध्ये असेल. तिन्ही दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर गोल्डन रँकसह एक मरुन रंगाचा पॅच (बिल्ला) पाहायाला मिळणार आहे.  यासंदर्भात एडीजीपीआयने ट्विटरच्या माध्यमातून काही फोटो शेअर केले आहेत. यात त्याने बेल्ट बकल, कॅप, कार फ्लॅग इत्यादींचे फोटो शेअर केले आहेत. रावत १ जानेवारीला पदभार हाती घेणार आहेत.  

चुकीला माफी नाही, मराठमोळ्या लष्करप्रमुखांचा पाकला इशारा

जनरल बिपिन रावत मंगळवारी लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्त झाले होते. सोमवारी पंतप्रधान निवासस्थानी रावत यांच्या फेअरवेअर डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावत यांना तुम्ही भारताचे पहिले सीडीएस होणार आहात, अशी माहिती दिली होती. त्यानंतर सोमवारी रात्री उशीराने गृहमंत्रालयाकडून अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. रावत ३१ मार्च २०२३ पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या नियुक्तीला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CDS dress will include Belt Buckle Buttons on Working Dress Shoulder Rank Badges Peak Cap in dress of cds bipin rawat