पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'नारळ'

निर्मला सीतारामन

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शूल्क मंडळाने (सीबीआयसी) सोमवारी आणखी २२ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले आहे. या अधिकाऱ्यांवर लोकहितार्थ मूलभूत नियम ५६ (ज) अंतर्गत निवृत्त केले आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार हे अधिकारी अधिक्षक दर्जाचे आहेत.

यापूर्वी सरकारने सीबीआयसीच्या १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले होते. हे अधिकारी सीबीआयसीचे मुख्य आयुक्त, आयुक्त आणि उपायुक्त श्रेणीचे होते. यामध्ये १९८५ च्या बॅचचे आयआरएस अशोक अग्रवाल यांचे नाव आघाडीवर होते. आयकर विभागाचे सहआयुक्त दर्जाचे अधिकारी अग्रवाल यांनी ईडीचे संयुक्त संचालक म्हणून काम पाहिले आहे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली १९९९ ते २०१४ दरम्यान त्यांना निलंबितही केले होते. 

तर, १० जून रोजी अर्थ मंत्रालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले होते. या अधिकाऱ्यांमध्ये प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्तांबरोबर आयुक्तांसारख्या पदांवरील अधिकाऱ्यांचाही समावेश होता.