तपास संस्थांनी सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना आणि पोलिस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना दिलेली क्लिन चिट सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने स्वीकारली आहे. न्यायालयाने मनोज प्रसाद विरोधात सीबीआयच्या आरोपपत्राचीही दखल घेतली आहे.
हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, अयोध्येत मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला
रॉज एव्हेन्यू कॉम्पलेक्स येथील न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी शनिवारी आपल्या आदेशात म्हटले की, राकेश अस्थाना आणि देवेंद्र कुमार यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. विशेष न्यायालयाने क्लिन चिट स्वीकारत राकेश अस्थाना यांना मोठा दिलासा दिला आहे. आलोक वर्मा यांच्या इशाऱ्यावर आपल्याविरोधात कपोलकल्फित गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा दावा अस्थाना यांनी पहिल्या दिवसापासून केला होता.
CBI vs CBI alleged graft case: The Court said as far as two public servants are concerned, the then Special Director Rakesh Asthana and the then DSP Devender Kumar, the court concurs with CBI finding that there is no sufficient material against them. https://t.co/AxlDQrEDmI
— ANI (@ANI) March 7, 2020
न्यायालयाने फसवेगिरी, गुन्हेगारी कट आणि पीसी एक्टच्या कलम ८ नुसार मनोज प्रसाद आणि सोमेश प्रसाद विरोधातील आरोपींची दखल घेतली आहे. याप्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आले होते. त्यांनाही आता आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले आहे.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर ED च्या कार्यालयात, चौकशी सुरु
सीबीआयने हैदराबादचा व्यापारी सतीश सनाच्या तक्रारीच्या आधारावर अस्थाना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. वर्ष २०१७ तील मांस व्यापारी मोईन कुरेशीचा सहभाग असलेल्या प्रकरणात सना चौकशीचा सामना करत आहे.