पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव प्रकरण: सीबीआयने कुलदीप सिंह सेंगरसह 10 जणांविरोधात केला गुन्हा दाखल

कुलदीप सिंह सेंगर

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये सीबीआयने कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणात भाजपने निलंबित केलेले आमदार कुलदीप सिंह सेंगरसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याव्यतिरिक्त तपास यंत्रणेने हत्या, हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी आणखी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या गाडीला अपघात झाल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. 

सरकार व बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकतात, विजय मल्ल्यांचे ट्विट

रविवारी उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये पीडित तरुणीच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर या अपघातामध्ये एका साक्षिदारासह दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात कुलदीप सिंह सेंगरसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उन्नाव प्रकरणाचे पडसाद मंगळवारी उन्नावपासून ते संसदेपर्यंत उमटले. लखनऊमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर लोकसभेमध्ये विरोधकांनी या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. 

बीकेसी ते वाकड फक्त २३ मिनिटांत, हायपरलूप प्रकल्प सहा वर्षांत साकारणार

दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र पाठवले होते, अशी माहिती समोर आली आहे. या पत्रामध्ये तिने तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे म्हटले होते. हे पत्र १२ जुलै २०१९ रोजी पाठवण्यात आले होते. 

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cbi registers case against kuldeep singh sengar including 10 others accused in unnao accident case