पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रीम कोर्टातील वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

इंदिरा जयसिंग

स्वयंसेवी संस्थेसाठी परकीय चलनातील निधी स्वीकारताना संबंधित कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे टाकले. दिल्लीस्थित घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशात भाजप आमदाराच्या मुलीच्या व्हिडिओमुळे खळबळ

दिल्लीमध्ये ५४ निजामुद्दीन पूर्व या ठिकाणी या दाम्पत्याचे निवासस्थान आहे. तिथे छापे टाकण्यात आले असून, सी ६५ निजामुद्दीन पूर्व या ठिकाणी लॉयर्स कलेक्टिव्ह या स्वयंसेवी संस्थेचे कार्यालय आहे. तिथेही छापे टाकण्यात आले आहेत. १८ जून २०१९ रोजी सीबीआयने या प्रकरणी लॉयर्स कलेक्टिव्हविरोधात गुन्हा दाखल केला होता. परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. लॉयर्स कलेक्टिव्ह या स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या परकीय निधीच्या वापरात अनेक कायदेशीर त्रुटी असल्याचे दिसून आले होते. 

आनंद ग्रोव्हर हे या संस्थेचे विश्वस्त आणि संचालक आहेत. या प्रकरणात अन्य काही जणांनाही आरोपी करण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CBI raids Supreme Court lawyers Indira Jaising Anand Grovers homes in foreign funding case