पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ED च्या जाळ्यात असलेल्या राणा कपूर यांच्यावर CBI ने दाखल केला गु्न्हा

राणा कपूर

येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर अडचणीत आलेले बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) नंतर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात राणा कपूर यांच्या कुटुंबियाची मालकी असलेल्या डीओआयटी अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रायवेट लिमिटेड आणि डीएचएफएल कंपनीच्या नावाचा समावेश आहे. 

Yes Bank: ३० तासांच्या चौकशीनंतर ईडीने राणा कपूर यांना केली अटक

येस बँक प्रकरणातील ईडीनं शनिवारी रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती.  मुंबईच्या विशेष न्यायालयाने त्यांना ११ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर आता सीबीआयनेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची संकेत मिळत आहेत. 

ईडीकडून येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या वरळी निवासस्थानी छापेमारी

ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या वरळीच्या निवासस्थानी छापे मारले होते. याठिकाणी चौकशी केल्यानंतर शनिवारी त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली होती.  जवळपास ३० तासांच्या चौकशीनंतर त्यांना रविवारी अटक करुन मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. राणा कपूर यांच्या चौकशी दरम्यान २ हजार कोटींची गुंतवणूक, ४४ महागडी पेंटिंगसंदर्भातील माहिती ईडीला मिळाली होती. राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची बनावट कंपनी अर्बन व्हेंचर्सला घोटाळेबाजांकडून ६०० कोटी रुपये मिळाल्याचा तपास ईडी करत आहे. येस बँकेने व्होडाफोन, डीएचएफएल, एस्सेल आणि अनिल अंबानी समूहासारख्या संकटग्रस्त कंपन्यांना कर्ज दिले आहे.