पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली: लाचप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला केली अटक

सीबीआय

दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. अटक केलेला अधिकारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा ओएसडी (विशेष कर्तव्य अधिकारी) असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटीसंबंधित प्रकरणात दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गोपाळ कृष्ण माधव नावाच्या अधिकाऱ्याला गुरुवारी रात्री उशिरा सीबीआयने अटक केली.

सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या

ओएसडीला अटक केल्याप्रकरणावर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया दिली असून 'लाच घेणाऱ्या ओएसडीवर कठोर कारवाई करा.', अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'मला आता माहिती पडले की सीबीआयने लाच घेताना जीएसटी इन्स्पेक्टरला अटक केली. हा अधिकारी माझ्या कार्यालयात ओएसडी म्हणून देखील कार्यरत होता. सीबीआयने त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. अशा अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मी स्वत: ५ वर्षात पकडले आहे.', असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी प्रशिक्षण अड्डे कार्यरत

तर एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनिष सिसोदिया यांनी सांगितले की, 'मला ओएसडीला अटक केल्याच्या वेळेची काहीच अडचण नाही. जो कोणी लाच घेईल त्याला त्वरित अटक केली पाहिजे. आमच्याकडे भ्रष्टाचारावर शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. दरम्यान, अटक केलेला ओएसडी गोपाल कृष्ण माधव २०१५ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात तैनात होता. 

अमेरिकेच्या हल्ल्यात अल कायदाचा नेता कासिम अल-रेमी ठार