पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय राऊतांना हे शोभत नाही, दुष्यंत चौताला यांची नाराजी

दुष्यंत चौताला

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेस्थापनेवरून सुरू असलेल्या शाब्दिक वादावादीमध्ये हरियाणाचे नवे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांना ओढल्यावरून त्यांनी स्पष्ट शब्दांत मंगळवारी नाराजी व्यक्त केली. संजय राऊतांसारख्या नेत्याच्या तोंडी अशी वक्तव्ये शोभत नाहीत, असे दुष्यंत चौताला यांनी म्हटले आहे.

'मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने शिवसेनेकडून बैठक रद्द'

ते म्हणाले, याचाच अर्थ दुष्यंत चौताला कोण आहेत हे संजय राऊतांना माहिती आहे. गेल्या सहा वर्षांपासून माझे वडील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यावेळी त्यांनी कधी त्यांची विचारपूस केल्याचे मला माहिती नाही. त्यांच्या तोंडी अशी वक्तव्ये शोभून दिसत नाही.

मंगळवारी सकाळी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना दुष्यंत या शब्दांचा वापर केला होता. ते म्हणाले होते की, आमच्या इथे कोणीही दुष्यंत नाही. ज्याचे वडील तुरुंगात आहेत. आम्ही इथे धर्म आणि सत्याचेच राजकारण करतो. शरद पवारांनी भाजपविरोधात वातावरण तयार केले आणि काँग्रेस कधीच भाजपसोबत जाणार नाही.

... हा तर वेगळाच राष्ट्रवाद, प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी इतरही पर्याय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण ते पाप आपल्या माथी नको, असेही त्यांनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. आम्ही कायम सत्याचे राजकारण करीत आलो आहोत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याच मुद्द्यावरून दुष्यंत चौताला यांनी संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाने हरियाणातील निवडणुकीनंतर भाजपशी आघाडी केली आहे. या पक्षाचे १० उमेदवार निवडून आले आहेत. आघाडीमध्ये दुष्यंत चौताला यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. शिक्षक भरती गैरव्यवहारामध्ये दुष्यंत चौताला यांचे वडील अजय चौताला यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.