पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांविरोधात गुन्हा दाखल

वारिस पठाण

'आम्ही फक्त १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू', असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारिस पठाणांविरोधात कलम ११७, कलम १५३ आणि कलम १५३ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का?: मनसे

कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएएविरोधात आयोजित केलेल्या एका जाहीर सभेत वारिस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यांनी असे म्हटले होते की, 'आम्ही फक्त १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत', 'स्वातंत्र्य मिळत नसेल तर हिसकावून घ्यावे लागेल आणि आता ती वेळ आली आहे.', असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. 

अक्षय्य तृतीयेला सुरु होऊ शकते राम मंदिराचे बांधकाम

दरम्यान, वारिस पठाण यांच्याविरोधात पक्षाने देखील कारवाई केली आहे. एमआएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर नाराजी वक्त केली. त्यांनी वारिस पठाण यांना पुढील आदेशापर्यंत प्रसार माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. तर, वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागणार नाही अशी भूमिका वारिस पठाण यांनी घेतली आहे. 'देश जेवढा नरेंद्र मोदींचा आहे तेवढाच वारिस पठाणचा आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे वारिस पठाणांनी सांगितले. 

'प्रहार जनशक्ती'च्या माजी जिल्ह्याध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या