हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चारही आरोपींचा शुक्रवारी पोलिसांच्या चकमकीत खात्मा झाला. एकीकडे पोलिसांच्या या कारवाईचे मोठे कौतुक केले जात आहे तर दुसरीकडे यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पोलिसांविरोधात चौकशीची मागणी करणाऱ्या काही याचिका दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलिस चारही आरोपींना घेऊन 'क्राईम सीन' रिक्रिएट करण्यासाठी गेले होते. याचदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करताना चौघांचा गोळ्या झाडून खात्मा करण्यात आला होता.
'भाजपला उतरती कळा लागल्याचे महाराष्ट्रातील निकालातून स्पष्ट'
अॅडव्होकेट जी एस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी न्यायालयाला म्हटले की, कारवाई दरम्यान पोलिसांनी न्यायालयाने २०१४ ला दिलेल्या निर्देशाचे पालन केलेले नाही. चकमकीत सामील असलेल्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे आणि चौकशी करुन त्यांच्याविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी आता सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीने स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील मनोहरलाल शर्मा यांनी आपल्या याचिकेत ज्या लोकांनी या गोष्टीचे समर्थन केले त्यांनाही यात ओढले आहे. माध्यमांच्या चौकशीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निगराणीखाली एसआयटी चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे.
Advocates GS Mani and Pradeep Kumar Yadav approached the Supreme Court saying the top court’s 2014 guidelines were not followed. #TelanganaEncounter https://t.co/HPTCmV2WKc
— ANI (@ANI) December 7, 2019
दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार आरोपी-शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ यांचा चकमकीत खात्मा झाला होता. या आरोपींना गुन्हा ज्याठिकाणी घडला होता. त्याठिकाणी त्यांना आणले होते. त्यावेळी पोलिसांचे हत्यार हिसकावून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चौघे मारले गेले.
Birth Anniversary: मराठी रंगभूमीवरील पराक्रमी वाघ..मोहन वाघ
पोलिसांच्या या कारवाईनंतर मोठे कौतुक करण्यात आले होते. घटनास्थळावर लोकांनी पोलिसांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. लोकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावही केला होता. परंतु, पोलिसांच्या या कारवाईवर मोठ्याप्रमाणात टीकाही होत आहे. अनेक लोकांनी न्यायालयाच्या मार्गाने जायला हवे होते, असे मत व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथकही हैदराबादला चौकशीसाठी पोहोचले आहे.