पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तरुणीनं शेअर केलेल्या कॉकपीटमधल्या 'त्या' फोटोमुळे वैमानिकाची नोकरीच गेली

'त्या' फोटोमुळे वैमानिकाची नोकरीच गेली

कॉकपीटमधला फोटो शेअर करणाऱ्या तरुणीमुळे चिनी वैमानिकाला कायमस्वरुपी आपली नोकरी गमवावी लागली आहे. इतकंच नाही तर त्याला कारवाईलाही समोर जावं लागणार आहे. 

 चीनमधील  Air Guilin विमान सेवेच्या वैमानिकानं कॉकपीटमध्ये एका तरुणीला प्रवेश दिला. चीनच्या नागरी हवाई वाहतूक विभागाच्या नियमाप्रमाणे कॉकपीटमध्ये वैमानिक आणि फ्लाइट अटेंडन्स सोडता कोणालाही प्रवेश नाही. सर्वसामान्य व्यक्तीला कॉकपीटमध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. हा महत्त्वाचा नियम पायदळी तुडवून वैमानिकानं तरुणीस प्रवेश दिला, त्यामुळे त्याचं निलंबन करण्यात आलं आहे. 

लहान मुलाविरोधात अपशब्द काढणाऱ्या स्वरा भास्करविरोधात तक्रार दाखल

हा प्रकार जानेवारी महिन्यात घडला. मात्र  तरुणीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केल्यानंतर संबधित प्रकरण उघडकीस आलं. हवाई उड्डाणादरम्यानच हा फोटो काढला गेला. कॉकपीटमधला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह तरुणीला अनावर झाला. मात्र अनेकांनी तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं दाखवून दिले. 

गोव्यातील या प्रसिद्ध ठिकाणी फोटोसाठी भरावा लागणार ५०० रुपयांपर्यंत कर

संबधीत तरुणीही विमानसेवेची कर्मचारी नाही तरीही तिला कॉकपीटमध्ये प्रवेश कसा दिला असा प्रश्न लोक विचारत आहे. तरुणीसाठी विमानसेवेचे महत्त्वाचे नियम पायदळी तुडवल्याबद्दल  वैमानिकाला नोकरीवरुन कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आलं आहे. 

अमानुषतेचा कळस, श्वानास गाडीला बांधून फरफटत नेले