पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'श्वासही घेऊ शकत नाही', ट्रम्प यांनी हवामान बदलाचे खापर भारतावर फोडले

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील हवामान बदलास भारत, चीन आणि रशियाला जबाबदार ठरवले आहे. या देशातील काही शहरांमध्ये श्वासही घेऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले. ब्रिटन दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ट्रम्प यांनी अमेरिका स्वच्छ हवामान असलेल्या देशापैकी एक असल्याचा दावाही केला. 

अमेरिकेचा भारताला दणका, विशेष प्राधान्याचा दर्जा काढला

आयटिव्हीशी बोलताना ट्रम्प यांनी ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य प्रिन्स चार्ल्स यांच्याबरोबर झालेल्या भेटीविषयी विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले की, या तीन देशांमध्ये हवा आणि पाणी चांगले नाही. जगातील वातावरणाप्रति या देशांनी आपली जबाबदारी व्यवस्थितीत पार पाडलेली नाही. 

ते म्हणाले की, आम्ही (ट्रम्प, प्रिन्स चार्ल्स) १५ मिनिटे चर्चा करणार होतो. पण आमची चर्चा दीड तास चालली.. बहुतांश वेळ तेच बोलत होते. हवामान बदलावर त्यांचे विशेष लक्ष आहे. मी त्यांना हे सांगितले की सर्व आकडेवारीवर नजर टाकली तर अमेरिका जगातील सर्वांत स्वच्छ हवामान असलेल्या देशांपैकी एक आहे.

ट्रम्प यांच्याशी बोलणं फिस्कटलं, उ. कोरियाने राजदुताला दिला मृत्यूदंड

चीन, भारत, रशिया आणि इतर काही देशांकडे स्वच्छ हवा नाही. चांगले पाणी नाही. प्रदूषण आणि स्वच्छतेविषयी काहीच नाही. जर तुम्ही एखाद्या शहरात गेलात.. मी नाव घेणार नाही.. पण मी सांगू शकतो. जर तुम्ही काही शहरांमध्ये गेलात तर श्वास घेऊ शकत नाही. ते आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, असेही ते म्हणाले.

ट्रम्प हे तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर ब्रिटनला आले होते. एखादा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ब्रिटनच्या दौऱ्यावर येण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २००३ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश आणि २०११ मध्ये बराक ओबामाही आले होते.

...तर परिणामांना सामोरे जावे लागले, ट्रम्प यांची चीनला तंबी!