पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्या, चारही दोषी पुन्हा कोर्टात

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी

फाशी देण्याला अवघे ४० तास उरले असतानाच दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. येत्या शनिवारी देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी दिल्लीतील न्यायालयात सादर केला. चार दोषींपैकी एक विनय शर्मा यांच्या दया याचिकेवरील निर्णय राष्ट्रपतींकडून आलेला नाही. त्यामुळे फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी दोषींची मागणी आहे. त्यांच्यातर्फे वकील ए पी सिंह यांनी हा अर्ज केला आहे. विनय शर्मा याने बुधवारी राष्ट्रपतींकडे फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी दया याचिका दाखल केली होती.

'नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदींचे विचार एकसारखेच'

न्यायालयापुढे केलेल्या युक्तिवादात ए पी सिंह यांनी म्हटले आहे की, एकाच गुन्ह्यामध्ये दोषी ठरविण्यात आलेल्या आणि एकाच प्रकारची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांपैकी एकाने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही. अशावेळी दिल्ली तुरुंग अधिनियमाप्रमाणे अर्ज करणाऱ्यां व्यतिरिक्त इतरांना फाशी दिली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे दया याचिका फेटाळल्यानंतर संबंधित दोषीला १४ दिवसांचा कालावधी दिला पाहिजे, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाचे ठरणारे पाच मुद्दे

निर्भया बलात्कार प्रकरणात न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह यांना येत्या १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीतील तिहार तुरुंगात सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.