पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंच्या पत्नीला कोरोनाची लागण

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या पत्नी

झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. याच दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कॅनडाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या पत्नी यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. 

कोरानाबाधितांचा आकडा थांबता थांबेना, राज्यात १४ जणांना लागण

भारतामध्ये कोरोना विषाणूने गुरुवारी पहिला बळी घेतला आहे. कर्नाटकमध्ये एका ७६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर भारतामध्ये आतापर्यंत ७६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली सरकारने कोरोना विषाणूमुळे शाळा, कॉलेज आणि चित्रपटगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. फक्त ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परिक्षा सुरु आहेत तेच सुरु ठेवण्याचे दिल्ली सरकारने सांगितले. 

दिल्ली हिंसाचार: पीएफआयच्या अध्यक्ष आणि सचिवासह १२ जणांना अटक

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये देखील कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. राज्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ वर पोहचली आहे. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. मात्र सरकारने अद्याप यावर निर्णय घेतला नाही.  

काँग्रेसकडून युवा नेते राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी