पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यामुळे कॅगने केले केजरीवाल सरकारचे कौतुक

अरविंद केजरीवाल

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) दिल्ली सरकारचे कौतुक केले आहे. कॅगने म्हटले की, दिल्ली सरकारने पाच वर्षांच्या आपल्या कार्यकाळात अतिरिक्त महसूलमध्ये सातत्य ठेवले आहे. कॅगने या वर्षीच्या आपल्या लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे की, गतवर्षींच्या तुलनेत कर आणि करा व्यतिरिक्तच्या महसुलात क्रमशः १४.७० टक्के आणि १०१.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. दिल्ली सरकारने २०१३-१४ ते २०१७-१८ पर्यंतच्या पाच वर्षांमध्ये अतिरिक्त महसूलमध्ये सातत्य ठेवले आहे.

केजरीवाल यांनी यासंबंधित 'हिंदुस्थान टाइम्स'चे वृत्त टि्वट करत म्हटले की, शाळा, रुग्णालय, पाणी आणि वीज यावरील खर्चांत पाच वर्षांत वाढ झाली आहे. महसूल अधिशेष कायम ठेवत, दिल्लीची आर्थिक सुधारणा करण्यात आली आहे. हे शक्य झाले ते केवळ दिल्लीतील अभ्रष्ट सरकारमुळे, जे सार्वजनिक कल्याणासाठी करदात्यांच्या पैशांचा वापर करते. 

देशाच्या अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल, चिदंबरम यांची टीका

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार वारंवार केंद्राकडून केंद्रीय करातील आपली हिस्सेदारी वाढवण्याची मागणी करत आले आहे. दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत दिल्ली सरकारने वैधानिक निगम, ग्रामीण बँक, संयुक्त स्टॉक कंपन्यामध्ये १९,१७३ कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यामुळे ०.८ टक्के फायदा झाला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CAG praises Arvind Kejriwal government for maintaining surplus revenue in Delhi despite lack of central funding