पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खातेवाटप जाहीर: अमित शहा देशाचे गृहमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखाते

नरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आले. नव्या खातेवाटपात अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आले आहे. तर अर्थमंत्रिपदी निर्मला सीतारामन यांची वर्णी लागली आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रेल्वे मंत्रालय पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आले आहे. देशाचे कृषिमंत्रीपद नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आले. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

असे आहे खातेवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी - कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणूऊर्जा, अंतराळ आणि वाटप न करण्यात आलेली इतर सर्व खाती

कॅबिनेट मंत्री

राजनाथ सिंह- संरक्षणमंत्री

अमित शहा- गृहमंत्री

नितीन गडकरी- वाहतूक आणि महामार्ग, लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग

सदानंद गौडा- रसायने आणि खते

निर्मला सीतारामन - अर्थ, कार्पोरेट व्यवहार

रामविलास पासवान- ग्राहक व्यवहार, अन्न-वितरण

नरेंद्रसिंह तोमर- कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास अणि पंचायती राज

रविशंकर प्रसाद- कायदा आणि न्याय, माहिती व तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स 

हरसिमरत कौर बादल- अन्न व प्रक्रिया उद्योग

थावरचंद गेहलोत- सामाजिक न्याय आणि सक्षक्तीकरण

डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय

रमेश पोखरियाल निशंक- मनुष्यबळ विकास मंत्रालय

अर्जुन मुंडा- आदिवासी कल्याण 

स्मृती इराणी- महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग

डॉ. हर्षवर्धन- आरोग्य आणि कुटुंबकल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू- विज्ञान

प्रकाश जावडेकर- पर्यावरण, वन आणि वातावरण बदल, माहिती व सूचना मंत्रालय, दूरसंचार 

पियूष गोयल- रेल्वे, कॉमर्स आणि उद्योग

धर्मेंद्र प्रधान- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टील उद्योग

मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यक मंत्रालय

प्रल्हाद जोशी- संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाण 

महेंद्रनाथ पांडे- कौशल्य आणि उद्योजकता

अरविंद सावंत- अवजड उद्योग

गिरीराज सिंह- पशुसंवर्धन, दुग्ध आणि मासेमारी

गजेंद्रसिंह शेखावत- जलशक्ती

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार)


संतोषकुमार गंगवार- श्रम आणि रोजगार

राव इंद्रजित सिंग- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी आणि नियोजन

श्रीपाद यस्सो नाईक- आयुष

जितेंद्र सिंह- ईशान्य क्षेत्र विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, निवृत्ती वेतन, अणू ऊर्जा, अंतराळ

किरेन रिज्जजू- युवक कल्याण आणि क्रीडा, अल्पसंख्याक

प्रल्हादसिंह पटेल- सांस्कृतिक आणि पर्यटन

राजकुमार सिंह- ऊर्जा, अपारंपारिक ऊर्जा आणि कौशल्य आणि उद्योजकता

हरदिपसिंग पुरी- गृहनिर्माण आणि नागरी विकास, नागरी उड्ड्यण, वाणिज्य आणि उद्योग 

मनसुख मांडविया- जहाजबांधणी, रसायन आणि खत

राज्यमंत्री

फग्गनसिंह कुलास्ते- स्टील उद्योग

अश्विनीकुमार चौबे- आरोग्य आणि कुटुंबकल्याण

अर्जुनराम मेघवाल- संसदीय कार्यमंत्री, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग

जनरल (नि) व्ही के सिंह- वाहतू्क आणि महामार्ग

कृष्ण पाल- सामाजिक न्याय आणि सक्षक्तीकरण

रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण, अन्न आणि वितरण

जी. किशन रेड्डी- गृह

पुरुषोत्तम रुपाला- कृषी आणि शेतकरी कल्याण

रामदास आठवले- सामाजिक न्याय आणि सक्षक्तीकरण

साध्वी निरंजन ज्योती- ग्रामीण विकास

बाबूल सुप्रियो- वन, पर्यावरण आणि वातावरण बदल

संजीवकुमाकर बलियान- पशुसंवर्धन, दुग्ध आणि मासेमारी

संजय धोत्रे- मनुष्यबळ विकास, दळणवळण, इलेक्ट्रॅानिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

अनुरागसिंह ठाकूर- अर्थ आणि कॉर्पोरेट

सुरेश अंगडी- रेल्वे

नित्यानंद राय- गृह

रत्तनलाल कटारिया- जल शक्ती, सामाजिक न्याय आणि सक्षक्तीकरण

व्ही मुरलीधरन- परराष्ट्र आणि संसदीय कार्य

रेणुकासिंह सरुटा- आदिवासी कल्याण

सोमप्रकाश- वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली- अन्न प्रक्रिया उद्योग

प्रतापचंद्र सारंगी- सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आणि पशुसंवर्धन, दुग्ध आणि मासेमारी

कैलाश चौधरी- पशुसंवर्धन, दुग्ध आणि मासेमारी

देबश्री चौधरी- महिला आणि बालकल्याण

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Cabinet portfolios announced Rajnath Singh new Defence Minister Amit Shah now Home Minister Nirmala Sitharaman Finance Minister