पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ

शेतकरी

मोदी सरकारने दिवाळीपूर्वी देशातील शेतकऱ्यांना एका मोठ्या भेटीची घोषणा केली आहे. रब्बी पिकांची पेरणी सुरु होण्यापूर्वी सरकारने हंगामातील प्रमुख पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चालू पीक वर्ष २०१९-२० (जुलै-जून) च्या आगामी रब्बी हंगामाच्या पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद

कॅबिनेटमध्ये गहू आणि बाजरीच्या एमएसपीमध्ये ८५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या निर्णयानंतर गव्हाचे समर्थन मूल्य १८४० रुपयांना वाढू १९२५ रुपये प्रति क्विंटल झाले आहे. एमएसपी वाढवण्याच्या निर्णयामुळे सरकारवर अतिरिक्त ३००० कोटी रुपयांचा बोजा वाढेल. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाकडून (सीएसीपी) रब्बी पिकांच्या एमएसपी वाढीची शिफारस केल्यापासून याच्या घोषणेची प्रतिक्षा केली जात होती.

काँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर

महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रब्बी पिकांच्या किमान हमीभावाची घोषणा करण्यास विलंब झाला. दोन्ही राज्यात सोमवारी मतदान झाले. त्यानंतर बुधवारी याबाबत घोषणा करण्यात आली.

'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Cabinet meeting today narendra modi government will give bumper diwali gifts to farmers announcement on MSP of Rabi crops possible