पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मिरच्या विभाजनाचा प्रस्ताव कॅबिनेटकडून ७ मिनिटांत मंजूर

जम्मू-काश्मिरचे विभाजन

काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा आणि या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचे प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या सात मिनिटांत मंजूर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या या प्रस्तावाचे उपस्थित सर्व मंत्र्यांनी टाळ्या वाजवून समर्थन केले. या घटनेशी संबंधित सूत्राने ही माहिती दिली.

जॅग्वारऐवजी BMW भेट दिली म्हणून तरुणाने ती चक्क नदीत फेकली!

जम्मू-काश्मिरचे कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे भाजपच्या अजेंड्यावर होता. यावेळी अमित शहा यांनी तो अग्रक्रमाने घेऊन त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरीही मिळवली. विशेष म्हणजे राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसतानाही हे विधेयक मंजूर करून घेण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले आहेत. जम्मू-काश्मिरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात येणार आहे. लडाख हा नवा केंद्रशासित प्रदेश असेल. लडाखमध्ये विधानसभा असणार नाही. जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा असेल. कलम ३७० रद्द केल्याने आणि हा केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे आता केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळता येईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडायला सुरुवात करताच सर्व उपस्थित मंत्र्यांनी त्यांच्यासमोरील डेस्क वाजवून या प्रस्तावाचे स्वागत केले. मंत्रिमंडळातील सर्वच सहकारी यावेळी भावनिक झाले होते, असेही या सूत्राने सांगितले. 

स्पाईसजेटने कमाविला रेकॉर्डब्रेक नफा!

कलम ३७० चा प्रस्ताव केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि अन्य मोजके मंत्री यांनाच माहिती होता. या संदर्भातील विधेयक तयार झाल्यानंतर काही वेळ आधी अन्य मंत्र्यांना त्याबद्दल माहिती देण्यात आली.