पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: सुमित्रा महाजनांसह भाजपचे नेते पोलिसांच्या ताब्यात

सुमित्रा महाजन

मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू असताना सुध्दा आंदोलन करणाऱ्या माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात भाजपने रॅली काढली होती. 

'बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद यशस्वी'

भाजपच्या रॅलीमध्ये सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग, खासदार शंकर ललवानी, इंदूरच्या महापौर मालिनी सिंग हे सहभागी झाले होते. या सर्वांवर कलम १४४ चे उल्लंघन केल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेत त्यांना जिल्हा कारागृहात घेऊन गेले आहेत.

रेडी रेकनरच्या दरात कपात करा, आदित्य ठाकरेंची शिफारस

या रॅलीला संबोधित करताना सुमित्रा महाजन यांनी सांगितले की, नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) केंद्राने बनविला आहे आणि राज्याने हा कायदा स्वीकारला पाहिजे. विरोधकांनी लोकांना भडकवण्या काम थांबवावे. त्यांनी पुढे असे सांगितले की, राज्यघटनेने केंद्राने कोणता कायदा तयार करावा याचा अधिकार दिला आहे. याच अधिकाराखाली केंद्र सरकारने हा कायदा केला आहे. मग हा कायदा पाळण्यास नकार देण्याचा अधिकार राज्याला नाही, असे त्यांनी सांगितले. 

NZvsIND : राहुल-विराटनं पाया रचला अन् श्रेयसने विजयाचा कळस चढवला!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:caa support rally sumitra mahajan and many bjp leaders detained by madhya pradesh police