पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA : कानपूरमध्ये पोलीस चौकीसह वाहने जाळल्याची घटना

कानपूरमध्ये आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला कानपूरमध्ये शनिवारी पुन्हा हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी गोळाबारात मृत पावलेल्या आंदोलकांना नुकसानभरपाई देण्याबाबतच्या मागणीसाठी यतीमखाना येथे मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी पोलींसावर दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता पेट्रोल बॉम्बच्या माध्यमातून पोलीस चौकीवर हल्ला करण्यात आला. पोलीस चौकीसह या ठिकाणची दोन पोलीस वाहनांसह काही खासगी वाहने जाळण्याचा प्रकार घडला आहे. 

CAA कायद्यासंदर्भातील जनजागृतीसाठी BJP राबवणार ही विशेष मोहीम

सकाळपासून शांतीच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले. रात्रीच्या वेळेस आंदोलनकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी वीज प्रवाह खंडीत  करण्यात आला होता. त्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा गोंधळ सुरुच होता. मोठ्या संख्येने आलेल्या गर्दीने प्रथम एकता पोलीस चौकीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणच्या  पोलीस फौजफाट्यांना त्यांना रोखल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा  यतीमखाना पोलीस चौकीच्या दिशेने वळवला. 

हैदराबाद एनकाऊंटरः आरोपींच्या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करा- तेलंगणा हायकोर्ट

आंदोलनकर्त्यांनी पोलीस चौकीला आग लावली. आंदोलकांनी लावलेल्या आगीत एक सरकारी पोलीस वाहन आणि आणि खासगी कारसह दोन बाइक जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.  आंदोलनकर्त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी वीज पुरवठा खंडीत आल्यानंतर पोलिसांनी गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबारीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अंधाराचा फायदा घेत आंदोलनकर्त्यांनी अंधाधूंद दगडफेक सुरु होती. पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा देखील करण्यात येत आहे. 

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

उल्लेखनिय आहे की गोरखपूरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात विविध भागात दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या हजारापेक्षा अधिक जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून याप्रकरणात २७ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.