पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA : काश्मिरात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात आंदोलनासाठी आणले होते

उत्तर प्रदेशात आंदोलकांनी जाळपोळ केली होती

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी उत्तर प्रदेशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) इतर राज्यातील लोकांना बोलावले होते. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांवर दगडफेक करण्यात अनुभवी असलेल्या तेथील तरुणांनाही उत्तर प्रदेशात बोलावण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएफआयच्या अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक आणि जाळपोळ केली. यावेळी आंदोलकांनी चेहऱ्यावर कापड बांधले होते. जेणेकरून कोण दगडफेक करतंय हे समजू नये, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सचिनच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

काश्मीर आणि अन्य राज्यांतून आणण्यात आलेल्या लोकांना उत्तर प्रदेशात लखनऊमधील वसतीगृहांमध्ये ठेवण्यात आले होते. जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसक आंदोलनाप्रमाणेच लखनऊमध्ये हिंसक आंदोलन करण्याचा पीएफआयचा इरादा होता, अशी माहिती समोर आली आहे.

लखनऊमध्ये १९ डिसेंबरला झालेल्या आंदोलनावेळी परिवर्तन चौक, खदरा आणि हुसैनाबादमध्ये जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्या आंदोलकांची ओळख पोलिसांना पटली आहे. आता त्यांच्याविरोधात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याबद्दल कारवाई सुरू करण्यात येणार आहे. लवकरच या सर्वांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

अडीच वर्षांपूर्वीच मी नवऱ्याचा खून केला, मला फाशी द्या; पत्नीचे पत्र

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांची ओळख पोलिसांच्या अहवालाच्या आधारे केली जाणार आहे. नक्की किती नुकसान झाले, याचेही मूल्यांकन केले जाणार आहे. पोलिस, महसूल विभाग आणि इतर विभागांकडून एकत्रितपणे हे काम केले जाणार आहे.