पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचारः गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाला अटक

दिल्ली हिंसाचारः गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाला अटक

सीएए कायद्याविरोधात उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूर येथे रविवारी आंदोलनास सुरुवात झाली. सोमवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी सोमवारी अनेक घरे, दुकाने आणि वाहनांना लक्ष्य करत त्यांना आग लावली. दरम्यान, मौजपूर येथे रस्त्यावर गोळीबार करत असलेल्या एका युवकाचा व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाले होते. या युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव शाहरुख असल्याचे सांगण्यात येते. तो जाफराबाद येथील रहिवासी आहे. शाहरुखने बंदुकीच्या आठ फैरी झाडल्या होत्या. त्याने एका कॉन्स्टेबलवरही पिस्तूल उगारली होती. पोलिसांनी शाहरुखला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. 

फडणवीस म्हणाले, 'आज वो हुए मशहुर जो कभी काबिल न थे!'...

दरम्यान, या हिंसाचारात एकूण ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ६ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाल्याचा प्राथमिक आकडा समोर आला आहे. 

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांसाठी निवडणूक

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चार मृतदेहांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा आढळल्या आहेत, तर दगडफेकीत गंभीर इजा होऊन हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. दिलशाद गार्डनमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयात हिसांचारातील जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथील शवागृहात ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

दिल्ली हिंसाचार प्रकरण हायकोर्टात, उद्या होणार सुनावणी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:caa protest Shahrukh who opened fire at police during violence in North East Delhi has been arrested by Police