पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA Protest: बुलेटप्रूफ जॅकेट नव्हे पाकिटातील नाण्यांमुळे कॉन्स्टेबलचा वाचला जीव

CAA Protest: बुलेटप्रूफ जॅकेट नव्हे पाकिटातील नाण्यांमुळे कॉन्स्टेबलचा जीव वाचला (ANI)

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथील आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या दरम्यान कॉन्स्टेबल विजेंदर कुमार (वय २४) यांना दुसरे जीवन मिळाले. शुक्रवारी या आंदोलनावेळी निर्दशकांमधून झाडण्यात आलेली गोळी विजेंदर कुमार यांच्या बुलेटप्रुफ जॅकेटमधून आरपार गेली. परंतु, पाकिटात असलेल्या नाण्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. ती गोळी नाण्यात जाऊन फसली. 

विजेंदर कुमार हे फिरोजाबादमधील पोलिस अधिक्षकांच्या एस्कॉर्टमध्ये सहभागी होते. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर अचानक गोळीबार सुरु झाला. यावेळी विजेंदर यांचा सहकारी धर्मेद्र याच्या पायाला गोळी लागली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मी देवाचे आभार मानतो. माझा हा दुसरा जन्म आहे, अशी प्रतिक्रिया थोडक्यात बचावलेल्या विजेंदर कुमार यांनी दिली. 

CAA Protest: दिल्ली शांत, यूपी आणि बिहारमध्ये उद्रेक

विजेंदर याबाबत म्हणाले की, बेछूट दगडफेक सुरु होती. यादरम्यान गोळीबार सुरु असताना मला जमावाला रोखायचे होते. याचदरम्यान एक गोळी माझ्या छातीच्या दिशेने आली. त्या गोळीने माझ्या बुलेटप्रुफ जॅकेटला छेदले. पण माझ्या पाकिटात असलेल्या भगवान शिव यांचे छायाचित्र आणि काही नाण्यांमुळे माझा जीव बचावला.

फिरोजाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात ४० पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये पोलिस ठाण्याचे प्रभारी, पोलिस उपनिरीक्षक, आणि कॉन्स्टेबलचा समावेश आहे. फिरोजाबादचे पोलिस अधीक्षक सचिंद्र पटेल म्हणाले की, हिंसक जमाव पोलिसांवार गोळीबार करत होता. प्रत्येक जखमी पोलिसांना सर्वोत्तम उपचाराची सुविधी दिली जाईल.

विक्रमादित्य सचिनने दिला 'त्या' वेदनादायी आठवणींना उजाळा