पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NPR च्या मुद्यावरुन अरुंधती रॉय यांचा PM मोदींवर निशाणा

अरुंधती रॉय

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) च्या मुद्यावरुन भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.  सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरकित्व नोंदणीच्या संदर्भात देशभरात आंदोलन पेटले आहे. दिल्लीत या मुद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनात बुधवारी  अरुंधती रॉय सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी एनपीआरच्या मुद्यावरुन भाजपवर तोफ डागली.

पवार साहेब चमत्कारी असल्याचे सांगत CM ठाकरेंचा भाजपला टोला

अरुंधती रॉय म्हणाल्या की, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) साठी अधिकारी लोक जेव्हा माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येऊन सदस्यांची नावे विचारतील तेव्हा त्यांना आपले नाव रंगा-बिल्ला आहे असे सांगा. पत्ता सांगताना '७ रेसकोर्स रोड' असा सांगा, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. आम्ही फक्त काठी आणि गोळी खाण्यासाठी जन्माला आलेलो नाही, असे सांगत त्यांनी एनपीआरचाही विरोध करायला हवा, असे म्हटले आहे. एनआरसी हा मुस्लीमांच्या विरोधात असून डिटेंशन कँम्पसंदर्भात मोदी सरकार खोटे बोल आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

CAA : काश्मिरात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना उ. प्रदेशात आणले होते

एनपीआरच्या मुद्यावर अरुंधती रॉय यांनी '७ रेसकोर्स रोड'चा उल्लेख करुन पंतप्रधानांवर निशाणा साधल्यामुळे वाद पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. '७ रेसकोर्स रोड' परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासह अनेक प्रसिद्ध राजकीय व्यक्तींची निवासस्थाने आहेत. नवी दिल्ली महानगरपालिकेकडून 'रेसकोर्स रोड'चे नामांतर करण्यात आले असून पंतप्रधानांचे निवासस्थान आता '७ लोककल्याण मार्ग' म्हणून ओळखले जाते. 

NPR प्रक्रियेचा NRC शी काहीही संबंध नाही : अमित शहा

मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) प्रक्रियेसंदर्भात मोठा निर्णय घेतला होता. या प्रक्रियेसाठी जवळपास ८ हजार ५०० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ६ महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. या एनपीआर या प्रक्रियेचा  एनसीआरशी काहीही संबंध नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीमधून स्पष्ट केले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: CAA protest Arundhati Roy says Give your name Ranga Billa address 7 Race Course Road to govt officials asking data for NPR Population Register