पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१९८० मध्ये उदयाला आले ते १९७० चे पुरावे मागताहेत, ममतांचा भाजपला टोला

ममता बॅनर्जी

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात वातावरण तापले आहे. देशभरातून कायद्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली ते १९७० पासून नागरिकत्व असल्याचा पुरावा मागत आहेत, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तोफ डागली. त्या कोलकातामधील रॅलीमध्ये बोलत होत्या. 

 

दिल्ली आंदोलन: काही मेट्रो स्टेशन सुरु, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून भाजप सरकार हिंदू-मुस्लीम समाजात दरी निर्माण करत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. आम्ही या देशात कोणाच्या मेहरबानीवर राहत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विशेष समुदायाला नुकसान पोहचवत आहे, असेही त्या म्हणाल्या.  

CAA: वाहतूक कोंडीत अडकले वैमानिक; इंडिगोच्या १९ विमानांचे उड्डाण रद्द

पश्‍चिम बंगालमध्ये नागरिकत्व कायद्याला विरोध करणासाठी तृणमूल काँग्रेसने  राज्यभर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) पश्‍चिम बंगालमध्ये लागू केली जाणार नसल्याच्या जाहिराती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्याचे पाहायला मिळाले होते. हजारो कार्यकर्त्यांसह ममता बॅनर्जी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे देखील पाहायलाम मिळाले होते.