पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही : राहुल गांधी

राहुल गांधी

नागरकित्व कायद्याच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशातील विविध भागात आंदोलनाच्या माध्यमातून कायद्याला विरोध दर्शवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

नागरिकत्व कायदाः लखनऊ-अहमदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, भारताचा आवाज दाबण्यासाठी आणि शांतीपूर्ण आंदोलन रोखण्यासाठी हे सरकार विद्यापीठात घुसून कारवाई करत आहे. आंदोलन थोपवण्यासाठी मोबाईल इंटरनेट सेवा, मेट्रो सेवा रोखण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हे सर्व करुन सरकार भारताचा आवाज दाबू शकणार नाही, असे त्यांनी भाजपला सुनावले आहे. 

CAA: भाजपने समोर आणला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडिओ

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशातील विविध भागात गुरुवारी व्यापक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. राजधानी दिल्लीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या घटना घडल्या. काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तर मेट्रो सेवा देखील स्थगित करण्यात करण्याची वेळ आली. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CAA Protest 2019 Congress leader rahul gandhi attacks says govt has no rights to shut down colleges