पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली सरकारच्या सूचनेनंतरही शाहिन बागमधील आंदोलन कायम

कोरोनाची धास्ती निर्माण झाली असताना शाहिन बागमधील आंदोलन सुरुच

कोरोना विषाणुच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने दिलेल्या सल्ल्यानंतरही दिल्लीतील शाहिन बागमध्ये सुरु असलेल्या सुधारित नागरिकत्व आंदोलनात मंगळवारी गर्दी पाहायला मिळाली. जवळपास ५०० महिला याठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतही खबरदारी न घेता आंदोलन सुरु कायम ठेवण्याचा अट्टाहास महिलांनी दाखवला. आमच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची आहे, असे सांगत महिलांनी कोणतीही काळजी न घेता आंदोलन सुरु ठेवण्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.  

सरकारी कर्मचारी ऑन ड्युटी अन् लोकलही ऑन टाइम, पण...

कोरोना विषाणूप्रमाणेच आपल्याला सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याविरोधात लढा द्यायचा आहे अशी प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या सोफिया यांनी दिली. एवढेच नाही तर सीएए आणि एनआरसी कोरोनापेक्षाही भयावह असल्याचे या महिलेने म्हटले आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करुन घरी बसणार नाही, असे सांगत सरकार आपला निर्णय बदलणार नाही तोपर्यं मागे हटणार नाही, असे या महिलेने सांगितले.   

इराणला गेलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण

रुखसत नावाच्या महिलने आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना संबोधित करताना सरकारने आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणीही क्लिनिक खोलावे, अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने खबरदारीसाठी शहरातील विविध परिसरात क्लिनक उघडली आहेत. याचा दाखला देत महिलेने सरकारने आंदोलनकर्त्यांची जबाबदारी स्वीकारावी अशी भूमिका मांडली. ५४ वर्षी नूरजहाँ म्हणाल्या की, सरकारला आमची चिंता असेल तर त्यांना कायदा मागे घ्यावा. सरकारने कायदा मागे घेण्याचा निर्णय घेतला की आम्ही आंदोलन त्वरित मागे घेऊ. जोपर्यंत सरकार आपला निर्णय बदलणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

सोलापुरातील विद्यार्थ्यांकडून 'गो कोरोना'चा हटके संदेश

देशात कोरोना विषाणुचे संकट निर्माण झाल्यानंतर दिल्ली सरकारने आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारकडून गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले असून देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाविरोधातील उपाययोजना म्हणून यावर भर दिला जात आहे. पण दिल्लीतील शाहिन बागमध्ये आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.