पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी आता शाहीन बागेत का जात नाहीतः काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी

शाहीन बागेत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) सुरु असलेल्या आंदोलनावरुन शाब्दिक चकमकी सुरु आहेत. भाजपने यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. तर केजरीवाल यांनी पलटवार करत भाजपवर घाणेरड्या राजकारणाचा आरोप केला आहे. याचदरम्यान, काँग्रेसनेही यात उडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरले आहे.

भाजप घाणेरडे राजकारण करतेय; अरविंद केजरीवाल यांचा आरोप

लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हटले की, 'तिहेरी तलाक विधेयकावेळी पंतप्रधान मोदींनी मुस्लिम भगिनींसाठी अश्रू ढाळले होते. जर पंतप्रधान प्रामाणिक असतील तर त्यांनी आता शाहीन बागेत गेले पाहिजे. या बागेत गेल्या काही आठवड्यापासून माता-भगिनी आंदोलन करत आहेत.' 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर पलटवार केला. या सर्वांसाठी भाजप जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. केजरीवाल यांनी टि्वट करत म्हटले की, शाहीन बागेत बंद रस्त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. यासाठी भाजप जबाबदार आहे. रस्ते खुले व्हावेत असे भाजपला वाटत नाही. भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. भाजपच्या नेत्यांनी शाहीन बागेत जाऊन चर्चा केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

CAA विरोधातील आंदोलनाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून आर्थिक मदत, ED कडून तपास