पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर ओवेसी सूर्य पश्चिमेला उगवतो असे म्हणतील: अमित शहा

ओवेसी आणि शहा

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात भाजपवर तोफ डागणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना अमित शहा यांनी टोला लगावला आहे. जर आम्ही सूर्य पूर्व दिशेला उगवतो असे म्हणत असेन तर ओवेसीजी सूर्य पश्चिम दिशेला उगवतो असे म्हणून विरोध करतील, अशा शब्दांत त्यांनी ओवीसींना टोमणा मारला आहे. 

NPR प्रक्रियेचा NRC शी काहीही संबंध नाही : अमित शहा

देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) संदर्भात विरोध सुरु असताना भाजप सरकारच्या कॅबिनेटने मंगळवारी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) ला मंजूरी दिली. या निर्णयानंतर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून या तिन्ही प्रक्रिया वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ओवेसींवर तोफ डागली. 

'NPRसाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही, जनतेवर आमचा पूर्ण विश्वास'

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत (एनआरसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिशाभूल करत असल्याचा आरोप यापूर्वी  ओवेसी यांनी केला होता. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहेत की अमित शहा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अमित शहा यांनी यावरही भाष्य केले. 

मोदी की शहा, कोण खरं बोलत आहे?, ओवेसींचा सवाल

रविवारी दिल्लीतील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मुद्दा चर्चेत नाही, असे म्हटले होते. यावरुन अमित शहा आणि मोदी यांच्यात एकवाक्यता नसल्याची टीका करत काँग्रेसनेही भाजपवर निशाणा साधला होता. मात्र मोदी जे काही बोलले ते खरं आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसंदर्भात कॅबिनेटने किंवा संसदेमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. शहांच्या या भूमिकेवर विरोधक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CAA criticism If we say that the sun rises from the east then Owaisi ji will say no it rises from the west Says Home Minister Amit Shah