पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एवढं खोटं का बोलता?; गृहमंत्र्यांचा काँग्रेस, ममता बॅनर्जींना सवाल

अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा आणि बसपावर निशाणा साधला. अमित शहांनी सांगितले की, ही लोकं नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत सांगतात की या कायद्यामुळे अल्पसंख्यांकांचे नागरिकत्व काढून घेण्यात येईल. मात्र या कायद्यामुळे देशातील एकाही अल्पसंख्याकांचे नागरिकत्व जाणार नाही, असे सांगत अमित शहांनी 'एवढं खोटं का बोलता?', असा सवाल त्यांना केला आहे.

निर्भया प्रकरणः फाशी जन्मठेपेत बदला, दोषी पवनची याचिका

ओडिशाच्या भुवनेश्वर येथे अमित शहा यांची सभा झाली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'मला आज सर्वांना पुन्हा हे सांगायचे आहे की नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशातील एकाही मुसलमान आणि एकाही अल्पसंख्यांक व्यक्तीचे नागरिकत्व जाणार नाही. सीएए हा फक्त नागरिकत्व घेणारा कायदा नाही तर नागरिकत्व देणारा कायदा आहे.' असे अमित शहांनी सांगितले. 

राज्यात लवकरच मुसलमानांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण

अमित शहांनी पुढे असे सांगितले की, 'मी मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आश्वासन देण्यासाठी आलो आहे की, हे राज्य सर्वांधिक चांगले राज्य तयार करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.' तसंच, 'मोदीजींनी त्यांच्या दुसर्‍या कार्यकाळात एक मोठी योजना आणली आहे. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरामध्ये नळामार्फत शुध्द पाणी पोहचवले जाईल. या योजनेचा सर्वात जास्त फायदा ज्या राज्याला होणार आहे ते राज्य म्हणजे ओडिशा आहे.' असे त्यांनी सांगितले. 

इंदोरीकर महाराजांचा कोल्हापूरातील किर्तनाचा कार्यक्रम रद्द