पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना बसने चिरडले; ७ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश बस अपघात

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना भरधाव बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये ७ भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

कलम ३७० हटवले त्याबद्दल अभिनंदन! पण...

नरौरा गंगाघाटवर ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन गंगास्नान करण्यासाठी हाथरस येथून नरौरा येथे आले होते. पहाटे ४ च्या सुमारास थकलेले काही भाविक रस्त्याच्या कडेला झोपले होते. त्याचवेळी भरधाव बसने त्यांना चिरडले. 

'ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं'

या अपघातानंतर बस चालक घटनास्थळावर बस सोडून फारार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु असून आरोपी बसचालकाचा शोध घेत आहेत. 

ठाण्यात प्रचार सोडून मनसे उमेदवार घालतोय पोलिस ठाण्याचे खेटे