पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवादी बुऱ्हान वाणीचा सहकारी लतीफ टायगरचा खात्मा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध जवानांची कारवाई

जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर लतीफ टायगर याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. काश्मिरमधील फुटीरतावाद्यांचा नेता बुऱ्हान वाणीचा लतीफ टायगर सहकारी होता. चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाल्यानंतरच त्यांची ओळख स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी सांगितले.

चीन-पाकला दणका, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

दरम्यान, या चकमकीत लष्करातील एक जवान जखमी झाला आहे. राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ज्या घरामध्ये पोलिस दडून बसले होते. त्यांची या कारवाईत पूर्णपणे पडझड झाली आहे. त्याचबरोबर शेजारच्या दोन घरांचेही नुकसान झाले आहे. घटनास्थळी काही स्थानिक तरुण आणि लष्कराचे जवान यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती पुढे आली आहे. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत एक तरुण छर्रा लागून जखमी झाला आहे.

आयसिसचा म्होरक्या बगदादी पाच वर्षांत पहिल्यांदाच जगासमोर

लतीफ टायगर हा पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराचा राहणारा होता. त्याचा खात्मा झाल्याचे वृत्त काश्मीर खोऱ्यात वेगाने पसरले. त्यामुळे अनंतनागसह अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. दक्षिण काश्मीरमधील काही जिल्ह्यांमध्येही हिंसाचार झाल्याची माहिती हाती आली आहे.