पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बुलबुल' चा प. बंगालला फटका, एकाचा मृत्यू

'बुलबुल' चा प. बंगालला फटका, एकाचा मृत्यू

ओ़डिशा आणि पश्चिम बंगालच्या तटवर्ती भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या 'बुलबुल' चक्रीवादळाचा कोलकातावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. कोलकातामध्ये सध्या सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळामुळे राज्याता अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी संपर्क तुटला आहे. 'भाषा' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राज्यात झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ आता सागर बेट (पश्चिम बंगाल) आणि खेपुपारा (बांगलादेश) मधून सुंदरबनला पार करत उत्तर-पूर्व भारताकडे जाईल. हवामान विभागाने पुढील तीन तास चक्रीवादळाला गंभीर श्रेणीत ठेवले आहे. त्यानंतर हे वादळ थोडे कमजोर होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. बुलबुल वादळामुळे कोलकाता विमानतळावरील संचालनही १२ तासांसाठी बंद करण्यात आले. रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद होती.