पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धार्मिक रंग न देता कारवाई करावी, बुलंदशहरप्रकरणी CM ठाकरेंची प्रतिक्रिया

योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात सोमवारी रात्री उशीराने दोन साधूंची मंदिर परिसरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. या प्रकरणाला कोणताही धार्मिक रंग न देता गुन्हेगारांना कठोर शासन करावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केलेल्या चर्चेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचार पद्धतीत मोठा बदल

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, बुलंद शहरात घडलेल्या प्रकरणाच्या संबंधात संबंधित राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली  त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. असा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये केला आहे.  

टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत

उद्धव ठाकरे यांनी या ट्विटच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार केल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील पालघरमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये दोन साधूंसह त्यांच्यासोबत असणाऱ्या एका चालकाने आपला जीव गमावल्याची दुर्घटना घडली होती. या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन केली होती.