पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लेकीचं कर्तृत्व पाहण्यासाठी सीतारामन यांचे आई-वडीलही संसदेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आई-वडील

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. आपल्या लेकीचे संसदेतील ऐतिहासिक भाषण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी निर्मला सीतारामन यांच्या आई-वडिलांनी संसदेत हजेरी लावली.

एएनआयने सावित्री आणि नारायणन सितारामन यांचा संसदेत प्रवेश करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  
यापूर्वी मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात निर्मला सितारामन संरक्षण मंत्री होत्या. पूर्णवेळ संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गावं, गरिब लोक आणि शेतकरी हे केंद्रबिंदू 

इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी १९७० मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कारभार होता. त्यानंतर तब्बल ४९ वर्षांनंतर पूर्णवेळ महिला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Budget Session 2019 Parents of Finance Minister Nirmala Sitharaman Savitri and Narayanan Sitharaman attend maiden Budget session