पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

अर्थमंत्री

आर्थिक मंदी, बेरोजगारी, वाढती महागाई या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्रातील भाजप सरकारवर कायम शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राकडे या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचवेळी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत अधिक निधी जमा होईल याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. वैयक्तिक प्राप्तिकर दात्यांना या अर्थसंकल्पात मोठा दिलासा देण्यात आला आहे. आपल्या पावणे तीन तासांच्या दीर्घकालीन भाषणात अर्थमंत्र्यांनी प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर विश्लेषण करीत २०२०-२१ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी लोकसभेत सादर केला.

अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा दुसरा अर्थसंकल्प. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर आले. त्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. देशातील आर्थिक परिस्थिती फारशी सकारात्मक नसताना या खात्याचे मंत्रिपद स्वीकारत त्यांनी अनेक निर्णय गेल्या नऊ महिन्यांच्या काळात घेतले. त्याचा पुढचा टप्पा आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये कृषी, ग्रामीण, शिक्षण, उद्योग, बँक निर्यात, मासेमारी क्षेत्रांच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विकासांवर भर देण्यात आला आहे. सरकारने शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, महिला यांच्या विकासावर देखील भर दिला आहे. 

Union Budget 2020: इन्कमटॅक्समध्ये मोठी सूट

अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण विकासासाठी तीन लाख कोटींची तरतूद करणार आली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी १५ लाख कोटींच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.  पाण्याची कमतरता असलेल्या १०० जिल्ह्यांमध्ये सरकार काम करणार आहे. १५ लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील पंप देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्य सरकारशी समन्वय साधून त्याठिकाणच्या विकासावर सरकार भर देणार आहे.  

अर्थसंकल्पातल्या या आहेत काही नव्या योजना

सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देणार आहे. सेंद्रीय खत वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहे. तसंच  नापिक जमिनीवर सरकार सौर उर्जाप्रकल्प उभारणार आहे.  विशेष म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील भागात असलेल्या तरुणांना मत्स्यपालनासाठी 'सागरमित्र योजना' सरकार सुरु करणार आहे. मत्स्य उत्पादन २०० लाख टनापर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी देशातील एक लाख ग्रामपंचायतींना सरकार 'भारत नेट' योजनेने जोडणार आहे. या योजनेसाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. झारखंडमध्ये आदिवासी म्युझिअम सुरु करणार आहेत. 

बँक ठेवीदारांना मोठा दिलासा, ठेवींवर आता पाच लाखांचा विमा

शहरी भागातील विकासावर देखील सरकारने भर दिला आहे. सरकारने उद्योगांसाठी २७ हजार ३०० कोटींची तरतूद, पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद केली आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उदिष्ट्य आहे. देशभरात ९ हजार किलोमीटरपर्यंत 'इकोनॉमी कॉरिडॉर' उभारण्यात येणार आहे. भाजप सरकार २००० किलोमीटरपर्यंतचे किनारी रस्ते तयार करणार आहे. तसेच ५५० रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. देशात तेजस एक्स्प्रेससारख्या गाड्या इतर अनेक मार्गांवर सुरु करण्यात येणार आहे. पर्यटन केंद्रांना जोडण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करणार आहे. 

Budget 2020 : .. असे आहेत Income Tax स्लॅबमधील बदल आणि नवे दर

नवीन शिक्षण धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ९९ हजार ३०० कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद आणि कौशल्य विकासासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान,  मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तूंची देशात निर्मिती व्हावी यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे. तसेच, देशात विमानसेवा वाढविण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी उडाण योजनेअंतर्गत १०० नवीन विमानतळे विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.  

LIC धारकांसाठी महत्त्वाची माहिती, सरकार काही हिस्सा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Budget 2020 know everything about union budget detailed information FM nirmala sitharaman