पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

LIC धारकांसाठी महत्त्वाची माहिती, सरकार काही हिस्सा विकणार

जीवन विमा निगम (एलआयसी)

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीमधील आपला काही हिस्सा शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून विकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केली. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी मांडण्यात आला. त्यावेळी निर्गुंतवणुकीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या.

Budget 2020 : .. असे आहेत Income Tax स्लॅबमधील बदल आणि नवे दर

याच घोषणांचा एक भाग म्हणजे एलआयसीतील आपला काही हिस्सा शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून विकण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर आयडीबीआय बँकेतील आपला काही हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विकण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. 

Union Budget 2020:निर्मला सीतारामण यांचं भाषण ठरलं रेकॉर्ड ब्रेक,पण..

देशातील सहकारी बँकांचे कामकाज अधिक नेमकेपणाने व्हावे, यासाठी बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या. यामध्ये पीएमसी बँक, शिवाजीराव भोसले सहकारी बँक आदींचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर नागरी सहकारी बँकांचे नियमन अधिक नेमकेपणाने व्हावे, यासाठी ही सुधारणा करण्यात येणार आहे.