पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्पातून गरिबांना बळ आणि युवकांसाठी उज्ज्वल भविष्यः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पातून गरिबांना बळ तर युवकांना उज्ज्वल भवितव्य देणारा असल्याचे म्हटले आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोदी हे लगेचच राष्ट्रीय वाहिनीवर येत अर्थसंकल्पावरील आपले मत नोंदवले. 

अर्थसंकल्पात 'स्टडी इन इंडिया', 'गांधीपीडिया'चा संकल्प

ते म्हणाले, हा देशाला समृद्धीकडे नेणारा आणि प्रत्येकाला समर्थ बनवणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले. या अर्थसंकल्पामुळे गरिबाला बळ मिळेल आणि युवकांना उज्ज्वल भविष्य मिळेल. मध्यमवर्गीयांची प्रगती होईल. विकासकामांना पैसा मिळेल. कर रचनाही सुलभ केली असून पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल. भारताला न्यू इंडियाच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या कृषीक्षेत्रात मोठा बदल होईल. या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत.

स्टार्ट अप्सला प्रोत्साहन, ग्रामीण भारताकडेही लक्ष

गाव, गरिबांचे कल्याण करणारा, निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा, तरुणांना रोजगाराच्या संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही ते म्हणाले.