पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्प २०१९: ३ कोटी दुकानदारांना मिळणार पेन्शन

३ कोटी दुकानदारांना मिळणार पेन्शन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० चे अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला. यावेळी त्यांनी दीड कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या देशातील ३ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांसाठी पंतप्रधान कर्मयोगी मानधन पेन्शन (निवृत्तीवेतन) योजनेची घोषणा केली. आता छोट्या दुकानदारांनाही पेन्शन मिळेल.

Union Budget 2019 : काय सांगता! पॅनकार्ड नाही, हरकत नाही...

छोट्या दुकानदारांना पेन्शन दिली जाईल. त्याचबरोबर  ५९ मिनिटांत सर्व दुकानदारांना कर्जही देण्याची योजना आहे. त्याचा फायदा देशातील ३ कोटींहून अधिक छोट्या दुकानदारांना मिळू शकेल.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकरासंदर्भातील कामांसाठी पॅनकार्डसोबत आधारकार्डही ग्राह्य धरण्याचे जाहीर केले. याचा अर्थ जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल आणि तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) भरायचे असेल, तर तुम्ही आधार कार्डचा वापर करू शकता. यासोबतच करांसंदर्भातील इतर कामांसाठीही पॅनकार्डसोबतच आधारकार्डही ग्राह्य धरले जाणार आहे.

Budget 2019 डबल धमाका! इलेक्ट्रिकल वाहनांसह गृहकर्जदाराला 'गिफ्ट'