पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2019: यंदा ब्रीफकेसऐवजी मखमली कापडात अर्थसंकल्पाची प्रत

यंदा ब्रीफकेसऐवजी मखमली कापडात अर्थसंकल्पाची प्रत (ANI)

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत. यावेळी सुरुवातीलाच एक वेगळी गोष्ट दिसून आली. दरवर्षी अर्थमंत्री हे संसदेत येताना अर्थसंकल्पाच्या प्रती या ब्रीफकेसमध्ये घेऊन येतात. पण यंदा सीतारामन यांनी लाल रंगाच्या मखमली कापडात अर्थसंकल्पाची प्रत आणली. या मखमली कापडावर भारत सरकारचे चिन्हही आहे. दरम्यान मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यांनी ही भारतीय परंपरा असून गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे हे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

अर्थमंत्री सीतारामन, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, अर्थ सचिव एस सी गर्ग, मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम अर्थसंकल्पाच्या प्रती घेऊन अर्थ मंत्रालयात पोहोचले. त्यावेळी सीतारामन यांच्या हाती मखमली कापडात झाकलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रती होत्या.

Budget 2019 : पहिल्याच अर्थसंकल्पात सीतारामन यांच्यापुढे ही आहेत आव्हाने

याबाबत सुब्रमण्यम म्हणाले की, ही भारतीय परंपरा आहे. ह पाश्चात्य विचारसरणीच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे प्रतीक आहे. हा अर्थसंकल्प नाही तर वही खाते आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Budget 2019 FM Nirmala Sitharaman keeping budget documents in four fold red cloth instead of a briefcase