पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शस्त्रसाठ्यासह हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक

अटक

जम्मू-काश्मीरच्या काझीपोरा भागातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.  बडगाम पोलिसांनी बुधवारी ही मोठी कारवाई केली आहे. हिज्बुल मजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हा दहशतवादी असून त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा मृत्यू; अमेरिकेची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव शोकत अहमद असे आहे. हा कुलगाम जिल्ह्यातल्या दमहल हांजी पोरा या भागामध्ये राहणारा आहे. त्याचा हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये तो सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

करमाळा इमारत दुर्घटना प्रकरण; मृतांचा आकडा दोनवर

अटक केलेल्या दहशतवाद्याकडून बडगाम पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा साठा जप्त केला आहे.  बडगाम पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : ईडीने मृत साक्षीदाराला २४ तासांत केलं जिवंत