पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video:बसपाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनीच काळं फासलं, चप्पलचा हार घालून गाढवावर फिरवलं

बसपाच्या नेत्याला कार्यकर्त्यांनीच काळं फासलं, चप्पलचा हार घालून गाढवावर फिरवलं

बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला सार्वजनिक ठिकाणी काळे फासले. हे कार्यकर्ते इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी चप्पलचा हार घालून त्यांना गाढवावर बसवून फिरवल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

INDvSA: विजयानंतर धोनीनं घेतली टीमची भेट, बीसीसीआयनं म्हटलं..

पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी तिकीट वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत चप्पलचा हार घातला आणि चेहऱ्याला काळे फासले. ही घटना मंगळवारी जयपूर येथील बनीपार्क स्थित रामजी गौतम आणि माजी बसपा राज्य प्रभारी सीताराम यांच्या चेहऱ्याला काळी शाई लावली आणि त्यांना चप्पलचा हार घातला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते कार्यकर्त्यांचे म्हणणे पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यापर्यंत पोहोचवत नाही तसेच ते भ्रष्टाचार करतात, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही

याबाबत एका कार्यकर्त्याने सांगितले की, आमचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांवर नाराज आहेत. कार्यकर्ता पाच वर्षे मेहनत करतो. पण नेता पैसे घेऊन भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना तिकीट देतात. बसपा कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचे शोषण केले जाते.  

दरम्यान, मायावती यांनी घटनेचा निषेध करताना काँग्रेसवर आरोप केला आहे. मायावतींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, काँग्रेसने पहिल्यांदा राजस्थानमध्ये बसपा आमदारांना फोडले आणि आता चळवळीचे नुकसान करण्यासाठी वरिष्ठ लोकांवर हल्ले करत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.

नोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BSP workers blackened faces of Ramji Gautam and Sitaram and paraded them on donkeys in Jaipur