पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतापल्या; उपस्थित केले हे सवाल

मायावती

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - ३७० हटवल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप संपला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत शनिवारी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेले. मात्र या सर्वांना विमानतळावर अडवत परत दिल्लीला पाठवण्यात आले. दरम्यान, राहुल गांधीसह विरोधी पक्षांच्या नेत्याच्या जम्मू-काश्मीरला जाण्यावरुन बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी संतप्त होऊन काही सवाल उपस्थित केले आहे.

 

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

मायावती यांनी राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, कोणत्याही परवानगी शिवाय काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांचे काश्मीरमध्ये जाणे केंद्र आणि राज्यपालांना राजकारण करण्याची संधी देण्यासारखे नाही का? तिथे जाण्यापूर्वी जर आपण त्याबद्दल जरा विचार केला असता तर ते योग्य ठरले असते.'

'जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवा'

यापुढे दुसऱ्या ट्विटमध्ये मायावती यांनी केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळेच ते जम्मू-काश्मीर राज्यात स्वतंत्रपणे कलम ३७० ची तरतूद करण्याच्या विरोधात होते. या कारणास्तव बसपाने संसदेत कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला.'

संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकरांचा दावा

तसंच त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'देशामध्ये संविधानाची अंमलबजावणीच्या सुमारे ६९ वर्षानंतर कलम ३७० हटवण्यात आले आहे. त्यामुळे आता परिस्थिती सामान्य होण्यास थोडा वेळ लागेल. थोडी प्रतिक्षा करणे चांगले असेल. ज्याचा न्यायालयाने देखील विचार केला आहे.'

जम्मू-काश्मीरः दगडफेकीत स्थानिक ट्रक चालकाचा मृत्यू